मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'सुकन्या समृद्धी' व 'आरडी' खाते उघडा; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 13, 2026

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'सुकन्या समृद्धी' व 'आरडी' खाते उघडा;




16 मार्चपासून अमरावतीत विशेष मोहीम

अमरावती, दि. १४ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): भारत सरकारच्या 'बेटी बचाव, बेटी पढाओ' आणि 'महिला सक्षमीकरण' अभियानांतर्गत अमरावती डाक विभागातर्फे 16 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सुकन्या समृद्धी खाते आणि 'आरडी खाते घरोघरी' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शून्य ते 10 वर्षे वयोगटातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये  बचतीची सवय रुजवण्यासाठी डाक विभाग विशेष पुढाकार घेत आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत, पालक आपल्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही नजीकच्या डाकघरात किमान 250 रुपये भरून उघडू शकतात. या योजनेवर सध्या 8.2% असा आकर्षक व्याजदर मिळत असून, खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड तसेच पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याशिवाय, बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी किमान 100 रुपये भरून आवर्ती ठेव (आरडी) खातेही उघडता येणार आहे, ज्यावर 6.7% व्याजदर लागू आहे. या खात्यासाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असून सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी डाक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शाळा, अंगणवाड्या आणि घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. पालकांनी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडून एक भरीव पाऊल उचलावे आणि स्वतःसाठी बचतीची सवय लावण्यासाठी आरडी खात्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर पि. ए. गेडाम यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages