अचलपूर येथे अवैध गौणखनिज वाहतुकीत जप्त वाहनांचा 25 मार्च रोजी जाहीर लिलाव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 13, 2026

अचलपूर येथे अवैध गौणखनिज वाहतुकीत जप्त वाहनांचा 25 मार्च रोजी जाहीर लिलाव

 


अमरावती, दि. १४ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ):अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अचलपूर तहसील प्रशासनामार्फत गौणखनिज भरारी पथकाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेली मात्र दीर्घकाळापासून दंडाची रक्कम न भरलेली 13 वाहने आता जाहीर लिलावात काढण्यात येणार आहेत. हा लिलाव येत्या 25 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता तहसीलदार, अचलपूर यांच्या दालनात पार पडणार आहे.

तहसील कार्यालय, अचलपूर अंतर्गत भरारी पथकामार्फत अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई करून अनेक वाहने जप्त करण्यात आली होती. नियमानुसार या वाहन मालकांना दंडाची आकारणी करण्यात आली होती, परंतु अनेक गैरअर्जदारांनी अद्याप शासकीय दंडाचा भरणा केलेला नाही किंवा कोणतीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. परिणामी, ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा आहेत. संबंधित वाहन मालकांना पत्राद्वारे दंड भरण्याची शेवटची संधी देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने, अखेर या वाहनांची विल्हेवाट लावून शासकीय दंडाची वसुली करण्यासाठी लिलावाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

या लिलावासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय , अमरावती यांच्याकडून सर्व 13 वाहनांचे तांत्रिक मूल्यांकन मागविण्यात आले होते. आरटीओकडून प्राप्त झालेल्या मूल्यांकन आणि घोषित 'हातच्या किमती'नुसार  हा लिलाव केला जाणार आहे. या जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना प्रशासनाने आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे शासकीय महसुलाची थकबाकी वसूल होण्यास मदत होणार असून, अवैध गौणखनिज माफियांनाही यातून कडक इशारा देण्यात आला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages