पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक विक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक विक्रम



मेळघाटात एकाच दिवशी 112 गावात 3 हजार 650 जात प्रमाणपत्रांचे वाटप

अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ थेट त्यांच्या दारी मिळावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज धारणी तालुक्याने नवा इतिहास रचला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज धारणी तालुक्यातील 112 गावांमध्ये एकाच दिवशी विक्रमी 3 हजार 650 जात प्रमाणपत्रांचे यशस्वीरित्या वाटप करण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणेने या मोहिमेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी केली होती. तहसील कार्यालय धारणीच्या चमुने तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात जात प्रमाणपत्रांचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध करून दिले होते. नागरिकांकडून हे अर्ज परिपूर्णरित्या भरून घेतल्यानंतर त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात पडताळणी करण्यात आली.  अर्जदारांकडून कोणतेही शुल्क न आकारता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. यासाठी लागणारा संपूर्ण निधी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आला, ज्यामुळे सामान्य आदिवासी बांधवांवर कोणताही आर्थिक भार पडला नाही.

आज सकाळपासूनच महसूल विभागाचे कर्मचारी 112 गावांमध्ये पोहोचले आणि त्यांनी थेट लोकांच्या घरापर्यंत जाऊन प्रमाणपत्रांचे वाटप केले. यामध्ये मोगरदा (286), बेरदाबलडा (251), राणामलूर (239), काकरमल (179), ढोमणाडाणा (108), ढाकरमल (107), नांदुरी (102), भूलोरी (97), टोली (91), तातरा (90), घोटा (89), टिटबा (83) आणि कुटगा (80) यांसह दुर्गम भागातील बोथरा, हरिसाल, सादराबाडी, दुनी, चिपोली आणि लवादा अशा एकूण 112 गावांचा समावेश आहे.

यामध्ये बोथरा (74), पोटीलावा (72), बुलूमगव्हाण (69), दुनी (59), सादराबाडी (57), हरीसाल (55), नारदू (51), झिलांगपाटी (51), चिपोली (50), मानसुधावडी (47), झिल्पी (44), राणीगाव (40), लवादा (38), हिराबबई (38), गडगामालूर (37), घोटा (33), राणी तंबोली (31), मांडू (31), कुसुमकोट खुर्द (30), रबाग (30), केकदाबोड (29), राणापिसा (29), बोबदो (29), धोदरा (28), पाटिया (27), ऊकूपाटी (27), बीबामल (23), सुसरदा (22) आणि खोपमार (20) या गावांचा समावेश आहे.

तसेच बिजू धावडी (20), मांडवा (20), चौराकुंड (20), कारा (19), रेहटा (17), कावडाझिरी (18), धारणमहू (17), राजपुर (17), सावलखेडा (16), नागझिरा (16), चेथर (15), कोठा (15), चटवाबोड (15), सावलीखेडा (15), जांबु (14), चीचघाट (14), गोंडवाडी (14), कासमार (13), डापका (13), गंभेरी (13), चाकरदा (12), चोपन (12), शिरपूर (12), धुळघाट (11), सावरया (11), धारणी (11), धुळघाट (11), भोडीलावा (11), जाम पाणी (10), तांगडा (10), आकी (9), मोखा (9), नागझिरा (8), झापल (8), कढाव (8), काटकुभ (8), टेमली (7), लाकटू (7), नागोडाना (7), बेरदाभुरू (7), खारी (7), गोलाई (6), बोरी (6), भोकरबर्डी (6), टिंगऱ्या (6), बास पाणी (4), गोलांडोह (4), दादरा (4), जामपाणी (4), गोबरकहू (4), पोहरा (3), कारदा (3), गंभेरी (3), खारराटेमरू (3), निरगुडी (3), खापरखेडा (3), पानखाल्ल्या (3), रत्नापूर (2), कसाई खेडा (2), खिडकी (2), बीरोटी (2), चीचघाट (2), दाबिदा (2), बोड (2) आणि बारू (2) या गावांतही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मागील वर्षी देखील धारणी तालुक्यात अशाच प्रकारचे विक्रमी वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या आणि पारदर्शकता जपण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान अत्यंत प्रभावी ठरले आहे. एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा आणि युवकांच्या नोकरीसाठी लागणाऱ्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

धारणी येथील महसूल उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील चमुने राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशस्वी नियोजनाबद्दल जिल्हा प्रशासनासह धारणी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages