अमरावतीत २० फेब्रुवारीपासून 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन व महोत्सवा'चे आयोजन; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

अमरावतीत २० फेब्रुवारीपासून 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन व महोत्सवा'चे आयोजन;



खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा उपक्रम

अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय (भारत सरकार) यांच्यामार्फत  दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 01 मार्च 2026 या कालावधीत अमरावती येथे 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गाडगे नगर, वलगाव रोड येथील संत गाडगे बाबा समाधी स्थळ यात्री मैदान येथे संपन्न होईल.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली वैधानिक संस्था असून, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आणि लोकांना स्वावलंबी बनवणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी दरवर्षी अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.

विभागीय कार्यालय, नागपूर यांच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनात देशभरातील विविध खादी संस्था, स्फुर्ती क्लस्टर आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत  स्थापित लघु उद्योगांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामुळे कारागिरांना हक्काची बाजारपेठ मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खादी वस्त्रे व ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करावीत, जेणेकरून स्वदेशी उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.

                                                                

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages