अमरावती येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ११३ उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

अमरावती येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ११३ उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 


अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्थानिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती कार्यालयाच्या आवारात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला.

 

त्यानुसार एकूण 91 रिक्त पदांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन 196 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 178 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या व मुलाखती दिलेल्या उमेदवारापैकी 113 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या मेळाव्यात नामांकित खासगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये इंदिराबाई मेघे महाविद्यालयाचे प्राचार्य अजय कोल्हे, डाटानोवा टेक्नॉलॉजी प्रा.ली. चे निशांत गिरी, भारतीय महाविद्यालयाचे आवारे, जिओ स्टोअर चे महेश कुंभार, हितेश गावंडे, सचिन निचले, शुभम ठवकर या उद्योजकांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पाडली तसेच त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विविध पदांवर प्राधानिक निवड केली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, अनिषेक ठाकरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सोहळे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कचरे यांनी केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages