कापुसतळणीत शुक्रवारी 'गाव भेट उपक्रम' - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 20, 2026

कापुसतळणीत शुक्रवारी 'गाव भेट उपक्रम'


*'शेतकरी-महिला संवाद' कार्यक्रमाचे आयोजन

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महसूल विभागातर्फे शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता 'गाव भेट उपक्रम 2026' अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, कापुसतळणी, ता. अमरावती येथे शेतकरी व महिला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.

यावेही आमदार राजेश वानखडे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अरोरा हे 'महिला संबंधित कर्करोग' यावर मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरादरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्यात प्रामुख्याने गावात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी शिबीर, नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे जागीच निवारण, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन, जनावरांच्या आरोग्यासाठी तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शेतकरी आणि महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजस्व मंडळ डवरगाव आणि तहसील कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages