गुरूवारी पेंशन अदालतीचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

गुरूवारी पेंशन अदालतीचे आयोजन



अमरावती, दि. ०४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
नागपूर येथील महालेखापाल कार्यालय आणि कोषागार कार्यालयातर्फे पेंशन समाधान मोहिमेंतर्गत पेंशन अदालतीचे आयोजन गुरूवार, दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात करण्यात आले आहे.

यामध्ये निवृत्ती वेतनविषयक प्रणालीमध्ये निवृत्ती वेतन प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच दुपारी 2.30 वाजता सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना त्यांचे निवृत्ती वेतनाबाबत अडचणी असल्यास महालेखापाल यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, तसेच निवृत्ती वेतनधारक तथा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहून अडचणीचे निराकरण करावे, असे आवाहन कोषागार कार्यालयाचे सहायक संचालक अमोल इखे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages