दि. २ फेब्रुवारी २०२६
३१ डिसेंबरच्या संध्याकाळचा सोनेरी किरणांमधला तो एक क्षण, जेव्हा मावळत्या सूर्याकडे पाहताना संपणार या वर्षातील गोड आठवणी डोळ्यासमोर उभ्या होत्या, लेकीने बाहेर डोसा खाण्याचा हट्ट धरला. लेखणीतून सवड काढत तिला घेऊन बाहेर पडले. दोघी डोसा सेंटरला जाऊन बसलो. डोस्याचे ऑर्डर दिल्यानंतर लेकी बरोबरच्या निष्पाप गप्पा दिवसाचा सर्व थकवा एका सेकंदात घालवत मनाला एक अनामिक शांती देत होत्या. मध्येच एका साधारण विशीतल्या तरूणीचा आवाज कानी घुमला " काकू,आज आणि उद्या डबा पाठवू नका..!" हे वाक्य संपताचं तर दुसर्या तरुणीचं बोलणं काही पडलं अगं तू काल रात्री देखील डबा खाल्ला नाहीस, अगं काल मॅगीने पोट भरलं होतं आज आपण बर्गर खायला आलोच ना आणि उद्या वाढदिवसाच्या पार्टीला पिझ्झाचा बेत आहेचं...! मी शांतपणे ऐकत होती. माझ्या लेखणीतून मला आज हेच सांगायचं आहे की, तरुण तरुणींनो जंक फूड फास्ट फूड राहा सावधान...!
यांच्या अति सेवनाने नका होवू आरोग्याविषयी बेभान....!
बदलत्या काळानुसार खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलेल्या,आजकाल प्रत्येकाला जंक फूड खाण्याचे वेड लागलेतं. तर अनेकजण हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा जंक फूडचे सेवन करतात. जंक फूड चवीला चविष्ट असतात, पण त्यात आरोग्यासाठी हानिकारक अशा अनेक गोष्टी असल्याने आपल्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते जंक फूडचे जास्त सेवन केल्याने शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते आणि यामुळे व्यक्ती अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते. कारण तुम्ही खात असलेल्या या जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज आणि खूप कमी पोषक घटक असतात. त्यात भरपूर फॅट, साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स असतात, जे आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. जर तुम्ही वेळीच या पदार्थांपासून दूर राहिला नाही तर तुम्ही अनेक असाध्य आजारांना बळी पडाल.
सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ काबरा हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आरती काबरा आरोग्य विषयक मार्गदर्शन करतांना सांगतात की,
फास्ट फूडचे सेवन मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. संशोधनानुसार, जंक फूड खाल्ल्याने थकवा, चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव आणि नैराश्यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. याचा विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास आणि एकूण विकासावर परिणाम होऊ शकतो.
म्हणून, फास्ट फूड तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग नसावा.
फास्ट फूड हे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे. त्यात असलेले ट्रान्स फॅट आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये प्लेक जमा होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. सध्या तरूणांमध्ये स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण वाढताना आपण पाहतोय. त्यासाठी फास्ट फूडचे अधिक सेवन हेदेखील कारण महत्त्वाचे ठरते आहे.
ताजे, संतुलित घरी शिजवलेले जेवण, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पुरेसे पाणी निरोगी शरीर राखण्यास मदत करते. मुलांना आणि तरुणांना योग्य खाण्याच्या सवयींबद्दल शिकवणे आणि त्यांना फास्ट फूडच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
अंबानगरीच्या नामांकित आयुर्वेदाचार्य श्री स्वामी समर्थ क्लिनिकच्या संचालिका डॉ.माया बोरखडे आपल्या सखोल अभ्यासातून आहाराविषयी मार्गदर्शन करतांना बोलतात की,
किशोर अवस्था म्हणजे बाल्य अवस्थे नंतरची आणि तारुण्य अवस्थेच्या पूर्वीची जी अवस्था ज्याला पौगंडावस्था असेही आपण म्हणतो ही अवस्था मुलींमध्ये येण्याचा कालावधी असतो मुलींमध्ये साधारण १० ते १९ वर्षे वयापर्यंत असणाऱ्या अवस्थेला आपण पौगंडवस्था असे म्हणतो.मुलींमध्ये ही किशोरावस्था वयाच्या बाराव्या वर्षापासून तर २० किंवा २१ वर्षे या कालावधीमध्ये असते.प्रदानुसार या अवस्थेमध्ये पित्तदोष हा खूप कार्यरत असतो आणि त्यामुळेच उष्णतेचे विकार चिडचिड त्वचारोग पचन तक्रारी या वयामध्ये आपण जास्त मुलींमध्ये ड्रेस डेव्हलपमेंट एलबी क्वेश्चन मध्ये बदल सेकंदारी कॅरेक्टर्स डेव्हलप होणे पिंपल्स येणे किंवा लक्षणे दिसून येतात. मुलांमध्ये आवाजामध्ये बदल होणे गाडी मिश्रा वाढणे त्याचप्रमाणे विरुद्धार्थी आपण बघतो त्या गोष्टीमध्ये पित्त कमी करणारा असा आहार घेणे खूप आवश्यक त्या वस्तूमध्ये मुलींमध्ये अशा प्रकारे आपण बघतो त्याचप्रमाणे मुलांमध्ये सुद्धा केस आणि रिलेटेड आपण काही लक्षणे घेतात किंवा स्टेट बोर्ड जास्त घेतात त्याच्यानंतर पॅकेज कोड प्रोसेस फुड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय कॅलरीज वाले कोल्ड्रिंक्स घेतात राईट फूड जास्त खातात ह्या अशा प्रकारच्या आहारामुळे हे सगळे विकार आपण या वयाच्या अवस्थांमध्ये किशोरावस्थेमध्ये बघतो की मुलांची दिनचर्या ही अतिशय चुकीची असते व्यायामाचा अभाव असतो उशिरा झोपणे उशिरा उठणे पाणी कमी पिणे आणि चुकीच्या वेळेला जेवण करणे ह्या कारणांमुळेच अशा लक्षणांना त्यांना सामोरे जावे किशोरावस्थेमध्ये हा अभ्यास क्रांतराचे किंवा Android glandsयांच्या secretionsमध्ये बदल घडवून येत असतात त्यांना आपण हार्मोन्स असे म्हणतो एक प्रकारचा संतुलन आवश्यक असते त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा hormonal imबॅलन्स किंवा संतुलन जर निर्माण झालं तर मग polycystic ovarian disease वगैरे असे केस पांढरे होणे असे लक्षणे आपण बघतो. किशोर अवस्थेमध्येच आपण बघतो की सामाजिक विकास सुद्धा मुलांचा होतो या अवस्थेमध्ये जर मुलांनी योगासने प्राणायाम मेडिटेशन सूर्यनमस्कार आधी गोष्टींचा अवलंब केलं तर त्यांच्या आरोग्यामध्ये सुद्धा दिसून येईल योग्य वेळेला जेवण घेणं योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे आणि आवश्यक तेवढी झोप वेळेवर घेणं या सर्व गोष्टींकडेही त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहारामध्ये फळे ड्रायफ्रूट्स दूध दही दूध ताक विविध रंगाच्या भाज्या या सर्व गोष्टींचा त्यांनी समावेश करा मोड आलेले कडधान्य सुद्धा त्यांनी योग्य प्रमाणामध्ये घेणे आवश्यक आहे अशाप्रकारे आहारामध्ये जर त्यांच्या संतुलन असेल तर त्यांची शारीरिक वाढ शारीरिक विकासही योग्य रीतीने होईल त्यांना कुठल्या सप्लिमेंट ची फार गरज भासणार नाही किशोरावस्थेमध्येच त्या मुलांची त्वचा मुलांचे केस त्यांचा बांधा आणि त्यांचं वजन या सर्व गोष्टी ठरत असते..
संकलन_ कंचन मूरके,अमरावती
Post a Comment
0 Comments