VNIT नागपूर येथे शेतकऱ्यांना बायोगॅस संयंत्रांचे वाटप; डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 1, 2026

VNIT नागपूर येथे शेतकऱ्यांना बायोगॅस संयंत्रांचे वाटप; डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती

 

 

 

नागपूर  दि. २ :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान,(VNIT) नागपूर येथे विदर्भातील शेतकऱ्यांना भारताच्या सुपर कॉम्प्युटरचे जनक, तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण डॉ विजय भटकर साहेब यांच्या हस्ते बायोगॅस संयंत्र वाटप करण्यात आले.

विदर्भातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (VNIT) ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष समारंभात विदर्भातील निवडक शेतकऱ्यांना बायोगॅस संयंत्रांचे (Biogas Plants) वाटप करण्यात आले. 
समृध्द विदर्भ समृद्ध भारत अंतर्गत विदर्भातील अकोला (मूर्तिजापूर),अमरावती व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारामती इको सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजी प्रा.ली तर्फे VNIT नागपूर येथे पद्मभूषण डॉ विजय भटकर साहेब यांच्या हस्ते आधुनिक बायोगॅस संयंत्र मोफत देण्यात आले यावेळी 

VNIT चे संचालक डॉ प्रेमलाल पटेल,बारामती इको सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजी प्रा लि चे संस्थापक श्री अभिमन्यू नागवडे,प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या विदर्भ संचालिका राजयोगिनी रजनी दीदी, समृद्ध भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पोद्दार व श्री धनंजय धार्मिक अध्यक्ष - (समृद्ध विदर्भ - समृद्ध भारत),व संयोजक डॉ अनिल वाघ, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मा.कुलगुरू डॉ कमलसिंह तसेच हरियाणा येथील डॉ जगवीर रावत उपस्थित होते

ग्रामीण विकास: या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचे इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.

डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन: डॉ. भटकर यांनी तंत्रज्ञानाचा वापर थेट शेतात आणि सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कसा करता येईल, यावर मार्गदर्शन केले.

शाश्वत शेती: बायोगॅस संयंत्रामुळे शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी मोफत इंधन मिळण्यासोबतच शेतीसाठी उत्तम दर्जाचे सेंद्रिय खतही उपलब्ध होणार आहे.

सहभाग: या कार्यक्रमात VNIT चे अधिकारी, संशोधक आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या उपक्रमाद्वारे विदर्भातील शेतीमध्ये शाश्वत ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages