शिरजगावात इंदिरानगर भागात सांडपाणी रस्त्यावर . - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 1, 2026

शिरजगावात इंदिरानगर भागात सांडपाणी रस्त्यावर .

 


 नागरिकांना साथ रोग होण्याची शक्यता

शिरजगाव कसबा  दिनांक २ (डींगाबर सुने)

             शिरजगाव कसबा येथील इंदिरानगर व मते लेआउट परिसरात  नागरिकांना आजही मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित असल्याचे  वास्तव्य पाहायला मिळत आहे. २ महिन्यापासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने  नागरिकांना साथ रोग होण्याची शक्यता आहे.

    गावातील ग्रामपंचायत कार्यालय यांना परिसरातील नागरिकांनी  २ महिन्यापासून लेखी  तक्रारी देऊन सुद्धा स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय तक्रारीला गांभीर्याने घेत नसल्यामुळे परिसरातील रहिवासी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य पालन कार्यकारी अधिकारी श्रीमती संचिता महापात्रा व पंचायत समिती चांदुर बाजार गटविकास अधिकारी निलेश वानखडे व स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते यांना मुख्य रस्त्यावरील सांडपाणी विसर्ग नियोजन व रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम तात्काळ करण्याचे मागणी तक्रारीचे  नम्रनिवेदन दिली आहे. परिसरातील नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्या याकरिता साकडे घातले आहे.  परतवाडा -शिरजगाव या मुख्य  महामार्गाला हा गावातील जोड रस्ता असून तो अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा गावातील अंतर्गत मार्ग आहे  संत गजानन महाराज विश्व मंदिरकडे दर्शनाला रोज भाविक गावातून याच रस्त्यावरून जातात तसेच  बाहेर गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी श्रीमती गंगाबाई गणोस्कर विद्यालय तसेच  संस्कार इंटरनॅशनल शाळेसाठी पोहोचण्याचा   हा मार्ग सोयस्कर व जवळ असल्याने विद्यार्थी

याच रस्त्याने ये जा करत असल्याने सांडपाण्यातून मार्ग काढत विद्यार्थी व भाविक तसेच परिसरातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या सांडपाण्यामुळे या भागातील नागरिकांना साथ रोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिसरातील नागरिकांच्या तक्रारीला जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन अनेक वर्षांपासून रहिवासी असलेल्या या भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा नाली बांधकाम करून रस्त्यावरील साचत असलेल्या सांडपाणी विसर्ग नियोजन करण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया:- १)वार्ड नंबर १ मधील इंदिरा नगर सिमेंट रोडला लागून सांडपाणी नाली नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर  माझ्या घरासमोर परिसरातील सांडपाण्याचे दाबके साचत आहे त्यामुळे मच्छर व दुर्गंधी पसरली असून आरोग्यास धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत या समस्या बद्दल तात्काळ दाखल घ्यावी. फिरोज खा दाऊद खा परिसरातील नागरिक. 

प्रतिक्रिया २)मुख्य रस्त्यावर सांडपाणी थांबत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम करण्यात येईल सध्या तात्पुरती रस्त्याच्या कडेला नाली खोदून रस्त्यावरील सांडपाणी  काढण्यात येईल अशी माहिती शिरसगाव कसबा ग्रामपंचायत कार्यालय ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते यांनी दिली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages