पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 30, 2026

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

   


* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत

अमरावती, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सन 2025-26 या वर्षासाठी 'पारधी पॅकेज' अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या फक्त पारधी आणि फासे पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पारधी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पाच मुख्य योजनांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट घेण्यासाठी अर्थसहाय्य. स्वयंरोजगारासाठी ऑटो रिक्षा खरेदीकरिता मदत, संगणक व झेरॉक्स मशीन खरेदी करून तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य, पारधी समाजातील बचतगटांसाठी ट्रॅक्टर खरेदीची सुविधा, गरजू लाभार्थ्यांना व्यवसायासाठी ई-खटला खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विविध तालुकानिहाय अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यासाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती कार्यालय, मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यासाठी उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असतील.

प्राप्त अर्जांची संगणकीय यादी तयार करून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांची निवड 'ईश्वर चिठ्ठी' पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील विकास शाखा किंवा दुरध्वनी क्रमांक 07226-224217 यावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages