राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहिर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 30, 2026

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहिर


         


          अमरावती, दि. ३१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद‌मार्फत २८ डिसेंबर, २०२५ रोजी इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती आयुक्त अनुराधा ओ‍क यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

          या परीक्षेच्या (सॅट व मॅट) विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. १६ जानेवारी २०२६ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार  विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जाणार नाही, याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

          या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) निकाल यथावकाश. परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असेही परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages