मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा

 

                                                          शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

*प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण

अमरावती,  दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दि. २५ आणि दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अमरावती येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्यानुसार श्री. भुसे अमरावती शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. सोमवार, दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता अमरावती शहर परेड मैदान, पोलीस मुख्यालय येथे भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता ते अमरावतीहून नागपूर विमानतळाकडे रवाना होतील.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages