श्री बालमुकुंद राठी विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

श्री बालमुकुंद राठी विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न



 शिरसगाव कसबा दिनांक २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

आंतरराष्ट्रीय बालिका दिन व आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवसाच्या निमित्ताने २४ जानेवारीला स्थानिक श्री बालमुकुंद राठी विद्यालयात  सामान्य ज्ञान स्पर्धा प्रश्नमंजुषा, व विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष , माजी सरपंच मा. श्यामसुंदरजी राठी होते.

प्रमुख पाहुणे सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजक नानासाहेब देवतळे, सौ. शोभा देवतळे, मनोहर सुने माजी सभापती जि. प. अमरावती, हेमंत राठी संचालक संस्था, सतीश सुरडकर मुख्याध्यापक, ज्ञानेश्वर नवलकर पर्यवेक्षक, जयसिंग गहेलवार, श्रीकृष्ण आवारे हजर होते. 

 ४० वर्षांची अखंड ज्ञानपरंपरा:

गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

४० वर्षापासून श्री बालमुकुंद राठी विद्यालयात नानासाहेब देवतळे सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्याकरिता आयोजित करीत असून त्यांना त्याच दिवशी  बक्षिसाचे वितरण करीत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली असून पुढील महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ते एमपीएससी, यूपीएससी ची तयारी करीत आहे. प्रश्नमंजुषा कार्यक्रमानंतर वर्षभरात विद्यालयामध्ये झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गावंडे यांनी केले आहे. तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर नवलकर यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages