राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 30, 2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली


      



  
अमरावती, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

             यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आदरांजली वाहिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages