डॉ. प्रवीण पारिसे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 30, 2026

डॉ. प्रवीण पारिसे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती निवड

 

         डॉ. प्रवीण पारिसे

मेळघाटातील अनुभवाचा जिल्हा परिषदेला फायदा होणार

अमरावती दिनांक ३१  ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क (डींगाबर सुने)

शिरजगाव कसबा निवासी डॉ. प्रवीण पारीसे यांच्याकडे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने  जिल्हा परिषद अमरावती चे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) पदांचा पदभार दिला आहे.

डॉ प्रवीण पारिसे या अगोदर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती या पदावर 2 वर्षापासून कार्यरत होते ,डॉ. सुरेश असोले यांची प्रशासकीय बदली सहाय्यक संचालक कृष्ठरोग यवतमाळ येथे झाल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती या पदाचा प्रभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे..डॉ. पारिसे यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता शासनाने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

डॉ प्रवीण पारिसे यांनी मेळघाट कार्यक्षेत्र मध्ये अती दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र हतरु तसेच तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा म्हणून काम केलेले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मेळघाट हे पद रिक्त असल्याने या पदाचा सुद्धा अतिरिक्त प्रभार त्यांनी सांभाळलेला आहे.  

हतरू आरोग्य केंद्र: अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिली.

तालुका आरोग्य अधिकारी (चिखलदरा): तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा पदावर येथे कार्यरत असताना त्यांच्या  टीम ने केलेल्या उत्कृष्ठ व नियोजनबद्ध केलेल्या नियोजनामुळे जून २०२४ मध्ये 'आकांक्षित तालुका कार्यक्रम' अंतर्गत तालुक्याला देशात द्वितीय पारितोषिक मिळाले होते.

प्राधान्यक्रम आणि पुढील दिशा:

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पारिसे यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली आहे. मेळघाट अती दुर्गम भागात मध्ये काम केल्यामुळे त्यांना येथील अडचणी व आरोग्य विषयक समस्यांचा चांगला अभ्यास आहे व त्यांनी स्वतः त्या अनुभवल्या आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती पदावर कार्यरत असताना मेळघाट मधील अधिकारी ,कर्मचारी लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था यां सर्वांसोबत समन्वय ठेवून बालमृत्यू, माता मृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबाबत समन्वयाने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बालमृत्यू ,माता मृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याकरिता वरिष्ठा सोबत तसेच इतर विभागासोबत समन्वय  साधून काम करायची आवश्यकता तसेच समस्यांचा खूप पाठपुरावा करायचे आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखवलेले आहे.

अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला गती देण्यासाठी आणि प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांचा हा अनुभव मोलाचा ठरणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages