परशुराम पब्लिक स्कूल सरफापूर चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, January 13, 2026

परशुराम पब्लिक स्कूल सरफापूर चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जागर

शिरजगाव कसबा (डींगाबर सुने) दिनांक १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      परशुराम पब्लिक स्कूल, सर्फापुर येथील वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे .यामध्ये स्कूलचे  सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व  कर्मचारी  या  सर्वानी सहभाग घेतला.यासाठी  सर्व पालक  आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

    कार्यक्रमाचे मुख्य अतिथि संस्थेचे सेक्रेटरी  सुरेश याऊल , अध्यक्ष सौ. मंदा याउल , संचालक मयूर याउल ,पंकज बेहरे , राकेश चौबे ,प मुख्याध्यापक सौ कविता बदुकले , सौ दिपाली बेहरे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घघाटन सौ मंदा याउल  यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथीचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी उपशिक्षणाधिकारी, अमरावती. माननीय   निखिल मानकर  यांनी भेट दिली. 

   वार्षिक स्नेहसंमेलनात नर्सरी ते वर्ग १० स्टँडर्ड  पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या  उत्साहात सहभाग घेतला आहे.भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या मराठी,हिंदी  गीतांवर देशभक्तिपर लोकगीते, डिस्को डान्स , तबला परफॉर्मन्स इत्यादी सादर करीत प्रेक्षकांचे मन जिंकण्यात आली आहे.

 यामध्ये विशेष प्री- प्रायमरी च्या विद्यार्थ्यां चे आकर्षण असलेला ड्रामा  अवेयरनेस ऑफ गुड टच अँड बॅङ टच.यामध्ये लहान मुलांना गुड टच, बॅड टच बद्दल जाणीव करण्यात आली आहे.

मोबाईल थीम(वर्ग २) यामध्ये मोबाईल चे चांगले, वाईट परिणाम सांगण्यात आले.यूनिटी आफ़ डाइवर्सिटी(वर्ग २) यामध्ये विविधतेत एकतेचे दर्शन करण्यात आले .हंगर थीम(वर्ग ४) यामध्ये अन्न वाया न घालता गरिबांना मदत करण्याचे संदेश देण्यात आले.गोरा कुंभार (वर्ग ५) यामध्ये विठ्ठल भक्तीचे उदाहरण देण्यात आले. रामायण डांस (वर्ग ६) यामध्ये  रामायण झांकीचे दर्शन देण्यात आले.करगिल ड्रामा यामध्ये देशभक्ति चे उत्तम प्रसंग दर्शविण्यात आले आहे.






Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages