सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 19, 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम



अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 115व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती क्षेत्रीय कार्यालयाने 'सेवा ही संकल्प' ही संकल्पना राबवत वर्धापन सप्ताह साजरा केला. 15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात बँकेने नफ्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे.

या उपक्रमाचा मुख्य भाग म्हणून क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी वलगांव येथील श्री संत गाडगे महाराज परमधाम वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी बँकेच्या वतीने वृद्धाश्रमासाठी प्रवेशद्वाराची कमान, फूड ट्रॉली आणि सुका मेवा प्रदान करण्यात आला. बँकेतील अधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक वर्गणीतून किराणा माल, फळे आणि ४  सीलिंग फॅनची भेट देऊन वृद्धाश्रमातील सोयी-सुविधांमध्ये भर घातली.

बँकेचा हा सेवायज्ञ केवळ वृद्धाश्रमापुरता मर्यादित न राहता, अमरावती येथील अपंग कल्याण संस्थेलाही 10 सीलिंग फॅन भेट देण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने बँकेने शहराच्या विविध भागांत 115व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 115 वृक्षांची लागवड केली. या सर्व उपक्रमांविषयी बोलताना जिल्हा अग्रणी प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी ग्वाही दिली की, सेंट्रल बँक ऑफ इंडिया भविष्यातही समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहील. या यशस्वी आयोजनासाठी मुख्य प्रबंधक दीपक दाभोळे, शीतल मेश्राम, राजकुमार तरटे यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages