स्केटिंग स्पर्धेत अद्विक बारंगेची दमदार भरारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 19, 2025

स्केटिंग स्पर्धेत अद्विक बारंगेची दमदार भरारी

 



■ दोन सिल्वर, एक ब्रॉंझ मेडल पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश


दि.२० अमरावती : परमानंद स्पोर्ट्स अकॅडमी, नाशिकच्या येथे आयोजित राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५- २६ मध्ये अमरावतीच्या अद्विक उज्वल बारंगे याने दोन सिल्वर आणि एक ब्रॉंझ मेडल प्राप्त करीत अमरावतीचे नाव रौशन केले आहे.
रोलर स्पोर्ट्स आणि कोचेस फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा संचालित महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रोलर स्पोर्ट्स अँड कोचेस (एमएआरएससी) च्या वतीने ही रोलर स्केटिंग स्टेट चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. अद्विक हा शहरातील प्रसिध्द रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉ. उज्वल आणि डॉ. वैशाली बारंगे यांचा मुलगा असून तो नारायणा विद्यालयाचा चौथीचा विद्यार्थी आहे. आठ ते दहा वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन करत अद्विकने राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. आजवर विविध रोलर स्केटिंग स्पर्धेत अद्विकने १७ पदके प्राप्त केली आहेत, हे विशेष. तो आपल्या यशाचे श्रेय प्रसाद रोलर स्केटिंग अकॅडमीचे संचालक प्रसाद जोशी, मार्गदर्शक मिलिंद सराफ, नारायणा विद्यालयाचे प्राचार्य सचिन भेलकर आणि क्रीडाशिक्षक क्षितिज मोहोड यांना देतो. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages