बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा २८ डिसेंबरला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, December 6, 2025

बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा २८ डिसेंबरला


'पानवेली' संस्थेद्वारे बारी समाजाचा भव्य वधू-वर मेळावा; १००० हून अधिक नोंदणी

 दि.०६ अमरावती: पानवेली बहुउद्देशीय संस्था, अमरावती यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रातील बारी समाजातील सर्वात मोठा 'राज्यस्तरीय उपवर वधू-वर परिचय मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती येथे हा मेळावा पार पडणार आहे.

स्थळ: संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती.

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत.

उद्देश: बारी समाजातील उपवर युवक-युवतींना आपला परिचय देण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

 या मेळाव्यासाठी १००० हून अधिक उपवर युवक-युवतींची नोंदणी झाली आहे. हा मेळावा महाराष्ट्रातील बारी समाजातील सर्वात मोठा उपक्रम मानला जातो, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मेळाव्याच्या निमित्ताने "पानवेली २०२५-२६" नामक रंगीत स्मारिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व नोंदणी झालेल्या वधू-वरांची छायाचित्रांसह एकत्रित माहिती असणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश व इतर राज्यातील अंदाजे ५००० हजार बारी समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज आहे. समाजातील लोकप्रतिनिधी, नामवंत डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी ,उद्योजक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम  संपन्न होणार आहे.

इच्छुक उपवर युवक-युवतींनी आणि त्यांच्या पालकांनी लवकरात लवकर बारी होस्टेल (बारी सदन), राठी नगर, अमरावती येथील संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: ९३२५४०६५९१, ७०२०१२१४५९ व ९८५०५२६१७९.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages