अमरावती शिक्षक मतदार संघाची प्रारूप यादी प्रसिद्ध - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 4, 2025

अमरावती शिक्षक मतदार संघाची प्रारूप यादी प्रसिद्ध


दावे-हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. ०५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत, दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या कार्यालयात ही यादी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध असून, यामध्ये सध्या 8 हजार 104 मतदारांची (पुरुष: 5 हजार 113 आणि महिला: 2 हजार 991) नोंदणी झाली आहे.

या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती सादर करण्यासाठी 3 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी आपली नावे तपासावीत आणि यादीत काही दुरुस्ती असल्यास किंवा नवीन नोंदणीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अथवा तहसीलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे निर्धारित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. प्राप्त झालेले दावे व हरकती निकाली काढून 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages