दि. ५ चांदूर बाजार (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शिरसगाव कसबा येथील सटवाईपुरा भागातील राहणारे ज्ञानेश्वर नथुजी भुसारी ओळखीच्या विवाह कार्याच्या स्वागत समारंभ सायंकाळच्या कार्यक्रमाकरिता परतवाडा येथे जात असताना रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोठ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रॅक्टर उभा असल्याची अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटर सायकलने मागून धडक दिल्याने मोटर सायकलवर स्वार असलेले ज्ञानेश्वर भुसारी वय ६५ यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळी गतप्राण झाल्याची घटना तारीख ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली संबंधित घटनेची माहिती परतवाडा व शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. परतवाडा पोलिसांच्या मदतीने ज्ञानेश्वर भुसारी यांना जखमी अवस्थेमध्ये खाजगी दवाखान्यात आणण्यात आले पण डॉक्टरांनी मृतक घोषित केल्याने उर्वरित तपासणी करिता त्यांचा मृतदेह उपजिल्हारुग्णालय अचलपूर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती परतवाडा - शिरजगाव पोलिसांनी दिली. वारकरी संप्रदायातील सदस्य असणारे ज्ञानेश्वर भुसारी यांच्या अकस्मित अपघाती निधन बातमीमुळे गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावातील गुरुवारला नियोजित होत असलेला दत्त मंदिरातील दत्त जयंती कार्यक्रम सुद्धा नागरिकांनी ज्ञानेश्वर भुसारी यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे रद्द केला आहे. ज्ञानेश्वर भुसारी हे वारकरी संप्रदायाचे सदस्य होते ज्ञानेश्वर भुसारी हे नाभिक समाजाचे असल्याने गावात शुभ व दुःखद कार्यक्रम निमंत्रण देण्याचे कार्य त्यांच्या हातून होत असे भजन कीर्तनाची आवड व मुखात नेहमीच राम कृष्ण हरी उच्चार असल्यामुळे त्यांना ज्ञानेश्वर महाराज नावाने सुद्धा गावात ओळखत होते. काल गुरुवारला गावातील हिंदू स्मशानभूमी मध्ये ज्ञानेश्वर भुसारी यांच्या पार्थिवावर वारकरी संप्रदायानुसार अंत्यविधी करण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने ग्रामस्थांनी अंतिम दर्शन यात्रेत सहभागी झाले होते त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये पत्नी २ मुली जावई नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
Thursday, December 4, 2025
Home
गावातली बातमी
ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघात : शिरसगाव कसबा येथील मोटर सायकल चालक ज्ञानेश्वर भुसारी यांचा मृत्यू
ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघात : शिरसगाव कसबा येथील मोटर सायकल चालक ज्ञानेश्वर भुसारी यांचा मृत्यू
Tags
# गावातली बातमी
Share This
About Gramin Uday
गावातली बातमी
Tags:
गावातली बातमी
Post Bottom Ad
Responsive Ads Here
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.