एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 4, 2025

एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 




अमरावती, दि.०५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अमरावती शहरात काल दि.४ डिसेंबर ला  'भव्य एड्स जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले. ‘अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू’ या घोषवाक्यासह शहरातील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

जिल्हा सामान्य रुग्णालयातून या रॅलीला महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचानालयाचे संचालक डॉ. विनोद कंदेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कंदेवाड यांनी जिल्ह्याने एचआयव्ही संक्रमणाचा टक्का कमी केल्याबद्दल कौतुक केले. सर्वसमावेशक जनजागृतीने एचआयव्हीच्या जनजागृती कार्यक्रमास मदत होईल आणि आपण निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेली ही रॅली रेल्वे कॉटन मार्केट, राजकमल, श्याम चौक मार्गे पुन्हा इर्विन चौकातून जिल्हा सामान्य रुग्णालयात समारोपित झाली. रॅलीत वैद्यकीय, नर्सिंग, समाजकार्य, कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. तसेच, अति जोखमीच्या गटांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे माहिती रथ यात समाविष्ठ होता, ज्यातून समुपदेशन आणि सुविधांची माहिती देण्यात आली. या यशस्वी आयोजनात अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages