केरळमध्ये नौदल दिनाचा भव्य सोहळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 2, 2025

केरळमध्ये नौदल दिनाचा भव्य सोहळा



 राष्ट्रपती मुर्मू, आयएनएस विक्रांत प्रमुख आकर्षण 

दि,३ केरळ : भारताच्या सागरी सामर्थ्याचे आणि १९७१ च्या युद्धात नौदलाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक असलेला 'नौदल दिन' (Navy Day) ४ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. यावर्षी, मुख्य सोहळा केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील शांघुमुघम समुद्रकिनाऱ्यावर आयोजित करण्यात आला असून, यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. 

स्वदेशी बनावटीची आणि भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल. विक्रांतसह १९ मोठी युद्धनौका, एक पाणबुडी आणि ३२ लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर  नौदलाचे सामरिक कौशल्य आणि ताकद दाखवून देतील.

नौदलातर्फे सागरी प्रात्यक्षिके, हवाई हल्ल्यांचे प्रदर्शन, पाणबुडीच्या हालचाली आणि समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल

'आत्मनिर्भर भारत' दर्शन: या कार्यक्रमातून 'आत्मनिर्भर भारत'  दृष्टिकोनांतर्गत नौदलाच्या स्वदेशी उपकरणांचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल

दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो, कारण याच दिवशी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ट्रायडंट'  अंतर्गत कराची बंदरावर यशस्वी हल्ला केला होता

या भव्य सोहळ्यासाठी सुमारे एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages