विड्याचे पान हृदयासाठी बहुगुणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 19, 2025

विड्याचे पान हृदयासाठी बहुगुणी



 संशोधनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष

दि.१९ पुणे: हृदयविकारातील गंभीर प्रकार मानल्या जाणाऱ्या 'हार्ट फेल्युअर' (हृदयाची कार्यक्षमता कमी होणे) या आजारावर पारंपरिक भारतीय वनस्पती असलेल्या विड्याच्या पानांचा (नागवेलीचे पान) पूरक उपचार म्हणून सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुण्यात करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहेत.

संशोधनाची माहिती

कालावधी: आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी पुणे येथे डिसेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत हे संशोधन केले.
रुग्णसंख्या: या अभ्यासात २४२ हार्ट फेल्युअर रुग्णांचा समावेश होता.
पद्धत: रुग्णांना दोन गटांत विभागण्यात आले. एका गटाला केवळ औषधोपचार, तर दुसऱ्या गटाला औषधोपचारांसोबत विड्याची पाने, ओल्या नारळाचा गर व थोडी वेलची किंवा वाळवलेल्या विड्याच्या पानांची कॅप्सूल असा पूरक आहार १२ आठवड्यांसाठी देण्यात आला. (यामध्ये चुना, कात, सुपारी, गुलकंद यांचा समावेश नव्हता.)
अभ्यासाअंती असे आढळून आले की, विड्याचे पान सेवन करणाऱ्या गटातील १० टक्के रुग्णांमध्ये इंजेक्शन फ्रॅक्शन ५० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच सामान्य मर्यादेत आले.
आयुर्वेदातील आधार
विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेलांसह अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्त्वे तसेच अँटिऑक्सिडंट व दाहशामक घटक आढळतात. भारतीय परंपरेत 'तांबूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानाला औषधी महत्त्व आहे. नारळ व वेलची यांचा समावेश पोषणमूल्य वाढवण्यासाठी करण्यात आला.
हा उपाय औषधांचा पर्याय नसून, औषधोपचारांना पूरक म्हणून वापरण्यात आला आहे, असे डॉ. खारतोडे यांनी स्पष्ट केले.
या संशोधनाच्या महत्त्वाची दखल घेत आयुष मंत्रालय, दुबई यांनी डॉ. स्वाती खारतोडे यांना हा अभ्यास आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंचावर सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages