आजपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 12, 2025

आजपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन

 


अमरावती, दि. १२ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या क्रीडा धोरणानुसार दरवर्षी क्रीडा सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी देखील दि. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार, दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

दि. १२ डिसेंबर रोजी विभागीय थांगता मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा, जिल्हास्तर टेनिस बॉल क्रिकेट क्रीडा स्पर्धा या विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ११ घेण्यात येणार आहे. दि. १३ डिसेंबर रोजी व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धा घेण्यात येतील. दि. १४ डिसेंबर रोजी स्व्कॅश, टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येतील. दि. १५ डिसेंबर रोजी स्पीडबॉल, कॉर्फबॉल श्री. गणेशदास राठी विद्यालय, अमरावती येथे घेण्यात येतील.

 टेनिस क्रिकेट स्पर्धा विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती घेण्यात येतील. दि. १६ डिसेंबर रोजी रस्सीखेच स्पर्धा गोल्डन किड्स इंग्लिश हायस्कूल, अमरावती येथे, तर डॉजबॉल स्पर्धा श्री. गणेशदास राठी विद्यालय, जिल्हास्तर सिलंबम क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येतील. दि. १७ डिसेंबर रोजी मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा नरसम्मा कॉलेज, अमरावती येथे, टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदुर बाजार, नेटबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येतील. दि. १८ डिसेंबर रोजी स्केटींग, कुडो, मल्लखाम स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात येतील.

यावेळी सन २०२४-२५ या वर्षात एकविध खेळ संघटनेमार्फत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील खेळाडूंनी स्पर्धेसाठी आणि राष्ट्रीय खेळाडूंनी सत्कारासाठी नाव नोंदणी दि. १५ डिसेंबरपर्यंत क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्याकडे नोंदवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages