महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 5, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर



स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी ;

जानेवारी ते डिसेंबर २०२६ पर्यंत विविध परीक्षांचे नियोजन

अमरावती, दि. ०६ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या परीक्षांसह गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांचे सुध्दा अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

महत्त्वाच्या सन २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या प्रमुख तारखा पुढीलप्रमाणे आहे :

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: ही पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑगस्ट २०२६ मध्ये अपेक्षित आहे. 

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६: नागरी सेवा मुख्य परीक्षा ०३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या दरम्यान होईल. या मुख्य परीक्षेचा निकाल अंदाजे फेब्रुवारी २०२७ मध्ये अपेक्षित आहे. 

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: पूर्व परीक्षा १४ जून २०२६ रोजी तर, मुख्य परीक्षा ०५ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे. 

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: पूर्व परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी तर, मुख्य परीक्षा १३ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे. 

इतर महत्त्वाच्या मुख्य परीक्षा (२०२५ मध्ये पूर्व परीक्षा झालेल्या भरतीसाठी) पुढीलप्रमाणे आहे :

राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५: २९ मार्च २०२६ पासून सुरू ते २३ एप्रिल २०२६ पर्यंत होईल. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५ : ०५ मे २०२६ पासून सुरू ते ०९ मे २०२६ पर्यंत होणार तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा व कृषि सेवा मुख्य परीक्षा- २०२५ : १६ मे २०२६ रोजी तर महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२५ -१६ मे २०२६ रोजी होणार आहे. उपरोक्त सर्व परीक्षांचे निकाल अंदाजे जुलै आणि ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होणे अपेक्षित आहे. 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages