अमरावती हादरले! शिरजगाव बंड येथे ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम आरोपी जेरबंद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 4, 2025

अमरावती हादरले! शिरजगाव बंड येथे ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम आरोपी जेरबंद



दि.४ अमरावती(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड हे गाव एका अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक घटनेमुळे हादरले आहे. गावातील एका ६ वर्षीय चिमुकलीवर एका ५६ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना २ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 पिडीत चिमुकली ही गावातील एका शाळेत शिकत होती. ५५ वर्षीय आरोपी राजू मुल्ला उर्फ रियाजुद्दीन जहिरुद्दीन मुल्ला याने घराशेजारी राहणाऱ्या पीडित मुलीला बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नेले आणि तिच्यावर लैगिक अत्याचार केला ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली.
 मुलीच्या आईने ३ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास तात्काळ सुरू केला. शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, त्यात आरोपीचा घृणास्पद कृत्य करतानाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.
आरोपी अटकेत, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल:
पुराव्यांनिशी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच ५६ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO - पोक्सो) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण चांदूर बाजार तालुका आणि अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.   
 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages