ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा;लाखो लोकांचा वेळ वाचणार"
दि.४ मुंबई (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सोयीस्कर सुविधा सुरू केली आहे. आता नागरिकांना आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी सरकारी कार्यालयात किंवा आधार केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. UIDAI ने 'आधार सेवा' पोर्टल आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून घरबसल्या आधार अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
तुम्ही आता घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकता. सरकारने नवीन आधार अॅपमध्ये ही सुविधा दिली आहे. त्याचवेळी तुमचा पत्ता, नाव आणि ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधाही लवकरच मिळणार आहे.
वापरकर्त्यांना हे बदल करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. अॅपवरील ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेटिकेशनद्वारे सर्व काही बदलता येणार आहे. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि स्थलांतरितांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे
एक महिन्यापूर्वी, यूआयडीएआयने आधारसाठी एक नवीन मोबाइल अॅप लाँच केले. वापरकर्ते एकाच फोनवर पाच जणांच्या आधारची माहिती ठेवू शकतात.
अॅपमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट केला जाईल?
पिन टाकून अॅपमध्ये लॉगिन करा. स्क्रोल करून खाली जा, सव्हिसेस अंतर्गत माय आधार अपडेटवर क्लिक करा.
नंतर अपडेट करण्याचा पहिला पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
सध्याचा मोबाईल नंबर एंटर करा, ओटीपी व्हेरिफाय करा. नवीन मोबाईल नंबर एंटर करा, ओटीपी व्हेरिफाय करा. यानंतर फेस ऑथेंटिकेशन होईल; कॅमेऱ्यात पहा व एकदा डोळे बंद करा. यानंतर पेमेंट पर्याय दिसेल; ७५ रुपये जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
कोणती माहिती घरबसल्या अपडेट करता येईल?
- नाव (Name): नावात काही बदल करायचा असल्यास.
- पत्ता (Address): नवीन पत्त्यावर स्थलांतर केल्यास.
- जन्मतारीख (Date of Birth): जन्मतारीख दुरुस्त करायची असल्यास.
- लिंग (Gender): लिंग माहितीमध्ये बदल करायचा असल्यास.
- भाषा (Language): प्रादेशिक भाषा निवडायची असल्यास
नवीन फिचर्स काय?
ई-आधार नेहमी तुमच्यासोचत राहील, झेरॉक्सची गरज नाही. आयडी शेअर करण्यासाठी चेहरा स्कॅन करावा लागेल. अॅप बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह उघडते. इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.इंटरनेट नसतानाही तुम्ही तुमचा आधार पाहू शकता.
UIDAI च्या अधिकृत SSUP पोर्टलवर जाऊन नागरिक स्वतः माहिती अपडेट करू शकतात. यासाठी वैध मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रक्रिया ओटीपी (OTP) द्वारे पूर्ण होते. पत्ता अपडेट करण्यासाठी संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतात.
नेमके काय होणार?
अॅपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी आहे. कोणतेही कागदपत्रे, प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत होईल. जर तुम्ही अॅप डाउनलोड केले नसेल, तर तुम्हाला ते डाउनलोड करावे लागेल.
येथे, वापरकर्त्यांना त्यांचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल. यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठयला आईल, व्हेरिफिकेशन करावे लागेल, त्यानंतर ६ अंकी लॉगिन पिन सेट करावा लागेल.
ज्या नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया कठीण वाटते, त्यांच्यासाठी UIDAI ने भारतीय टपाल विभागाशी (India Post Payments Bank - IPPB) सहकार्य केले आहे. या सुविधेमुळे पोस्टमन तुमच्या घरी येऊन पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासारख्या सेवा प्रदान करू शकतो.
आधार मोबाइल अपडेट का आवश्यक आहे?
१.आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे. मोबाईल नंबर हा यात सर्वात महत्वाचा घटक आहे, कारण तो ओटीपीद्वारे बैंक खाती, सरकारी अनुदाने, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांमध्ये प्रवेश प्रदान करती
२.जर नंबर जुना झाला किंवा हरवला तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पूर्वी तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रात जावे लागत असे, त्यात बायोमेट्रिक पडताळणीचा प्रास आणि लांब रांगा असायच्या, मात्र, यूआयडीएआयने आता ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सोपी केली आहे.
- वेळेची बचत: केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
- सुविधा: ही सेवा २४ तास उपलब्ध आहे (ऑनलाइन पोर्टलसाठी).
- पारदर्शकता: अपडेटची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करता येते.
या सुविधेमुळे डिजिटल इंडिया मोहिमेला बळ मिळाले असून, नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यास मदत झाली आहे.
२००९ मध्ये आधार कार्ड प्रणाली सुरू झाली.
१३० कोटींपेक्षा अधिक जणांकडे सध्या आधार कार्ड आहे
Post a Comment
0 Comments