मोठी बातमी: राज्यातील २२ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित; उमेदवारांमध्ये निराशा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 1, 2025

मोठी बातमी: राज्यातील २२ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित; उमेदवारांमध्ये निराशा

 


दि.१ (अमरावती):- महाराष्ट्र राज्यातील २२ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या आणि उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे.

 या निवडणुका पुढे ढकलण्यामागे कायदेशीर आणि तांत्रिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आला असण्याची शक्यता आहे.

 राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात अधिकृतपणे आदेश जारी केले आहेत. 

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज भरले होते आणि प्रचाराची तयारी केली होती. अचानक आलेल्या या निर्णयामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.  पुढील तारखांबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages