वीज थकबाकीदारांसाठी महावितरणचा मोठा इशारा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 1, 2025

वीज थकबाकीदारांसाठी महावितरणचा मोठा इशारा


घरातून वीजमीटर काढणार
दि.१ अमरावती:  महावितरणने वीजदेयक थकवणाऱ्या ग्राहकांवर सक्तीची मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या वीज बिल वसुली मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, कंपनीने आता कठोर भूमिका घेतली आहे. 
वीजबिल वसुली रखडल्यामुळे महावितरणने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वीजदेयक थकविणाऱ्या ग्राहकांचे आता थेट वीजमीटर काढण्यात येणार आहेत. ज्या ग्राहकांचे मीटर काढले जातील, त्यांना नवीन कनेक्शन घेताना 'टीओडी' (Time of Day) मीटर लावणे अनिवार्य असेल.  अमरावती जिल्ह्यात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे एकूण २८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यात सर्वाधिक थकबाकी स्ट्रीट लाईट (१२५.१८ कोटी) आणि जलपूर्ती (८७ कोटी) श्रेणीत आहे. 
  वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना एकूण थकीत रक्कम, चालू महिन्याचे बिल आणि पुन:कनेक्शन शुल्क भरावे लागेल.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी वीजबिल वसुलीमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जे अधिकारी, कर्मचारी उद्दिष्टानुसार काम करणार नाहीत किंवा हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल वीज थकबाकीदारांवर महावितरण 'ॲक्शन मोड'वर; बिल न भरल्यास थेट मीटर काढणार
थकबाकी न भरल्यास ग्राहकांना अंधारात राहावे लागेल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages