२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 6, 2025

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा

 परीक्षेबाबतच्या माहितीसाठी www.mscepune.in व http://mahatet.in संकेतस्थळ उपलब्ध


          राज्यात महा टीईटी परीक्षा येत्या २३ नोव्हेंबरला  होणार 

MAHA TET परीक्षा अपडेट


 

अमरावती दि. 0७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2025 (टिईटी-2025) परीक्षेचे आयोजन रविवार, 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

या परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी माध्यमांच्या विद्यार्थी/उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांना परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत, याची संबंधित सर्व विद्यार्थी / उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षेसंबंधीच्या चुकीच्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरु असून, परीक्षेसंबधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती उपलब्ध करुन देण्यात येते. परीक्षेसंबंधी युट्युब चॅनल्स, सोशल मिडिया प्लेटफॉर्मद्वारे व प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करण्याऱ्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व  http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. याबाबत सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे. 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages