भूमि अभिलेख विभागातील गट क पदांची १३ व १४ नोव्हेंबरला परीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 6, 2025

भूमि अभिलेख विभागातील गट क पदांची १३ व १४ नोव्हेंबरला परीक्षा


परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्राबाबत माहिती

https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध



 

अमरावती दि.०७  : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 1 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकृतीचे कामकाज करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे, असे जमाबंदी आयुक्त आणि संचालक (भूमि अभिलेख) डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : दि. 13 नोव्हेंबर रोजी प्रथम सत्रात पुणे, अमरावती विभागांची परीक्षा होणार असुन उमेदवारांची परीक्षा केंद्रावर रिपोर्टींगची वेळ सकाळी 8.00 वाजताची राहील. त्याच दिवशी ( 13 नोव्हेंबर) द्वितीय सत्रात नाशिक व नागपूर विभागातील परीक्षा होणार असुन उमेदवारांची परीक्षा केंद्रावर रिपोर्टींगची वेळ दुपारी 12 वाजताची असेल.

            दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी, प्रथम सत्रात मुंबई (कोकण) विभागाची परीक्षा होणार असून उमेदवारांची रिपोर्टींगची वेळ सकाळी 8.00 वाजताची असेल. दुसऱ्या सत्रात छ.संभाजीनगर विभागाची परीक्षा होणार असुन उमेदवारांची रिपोर्टींगची वेळ दुपारी 12 वाजताची असेल.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवाराने विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावयाचे असून प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही.

परीक्षा ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) होणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असून शकते. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली  असून परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता लिंक विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे भूमि अभिलेख विभागाव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages