भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 6, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


            अमरावती, दि. 0७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (पण शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ) 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि मर्यादित शासकीय वसतिगृहांची जागा लक्षात घेऊन, अनेक विद्यार्थी निवासाच्या समस्येमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 50 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.

 स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा आणि मर्यादित प्रवेशक्षमतेमुळे त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.

पात्र विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा.

 

अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, अमरावती (दूरध्वनी क्रमांक 0721-2661261) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages