जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 18, 2025

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न





 अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काल  मार्गदर्शन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश-1 तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.

या कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी उपेक्षिततेच्या समस्यांबाबत मार्गदर्शन’ जिल्हा न्यायाधीश यशवंत गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा सरकारी वकिल परिक्षित गणोरकर ज्येष्ठ नागरिक संघाचे पुरुषोत्तम गावडे, यांनीही मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे संचालन अॅंड श्रीमती प्राजक्ता वरुडकर यांनी तर आभार अॅंड अमित सहारकर यांनी मानले. यावेळी  जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व कामगार नेता डॉ दामोदर पवार, अमरावत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages