२३ नोव्हेंबरला, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, राज्यभरातील ४ लाख ७५ हजार ६६९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

२३ नोव्हेंबरला, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, राज्यभरातील ४ लाख ७५ हजार ६६९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

 


अमरावती, दि. २१ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025चे आयोजन दि.23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 37 जिल्ह्यातील 1 हजार 423 जिल्हा मुख्यालयाच्या केंद्रावर करण्यात आले आहे. या परीक्षेच्या आयोजनाच्या कार्यवाही संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

पेपर एकसाठी 2 लाख 3 हजार 334 उमेदवार व पेपर दोनसाठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवार असे एकूण 4 लाख 75 हजार 669 उमेदवार महाटिईटी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या परिक्षार्थींची संख्या आहे. पेपर एक साठी 571 परीक्षा केंद्र आणि पेपर दोनसाठी 852 केंद्र अधिग्रहीत असून संपूर्ण वर्गखोल्या व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरक्षा तपासणीसाठी मेटर डिटेक्टरच्या सहाय्याने फ्रिसकिंग केले जाणार आहे. तसेच परिक्षार्थींच्या आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधर्म्य तपासण्यासाठी बायोमेट्रीक व फेस रिक्गनीशन तपासणी करण्यात येणार आहे.

सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकाच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याव्दारे लाईव्ह कास्टींगच्या माध्यमातून सर्व परीक्षा दालनांवर जिल्हा व राज्यस्तरावरून अत्यंत काटेकोरपणे सनियंत्रण ठेवले जाणार आहे. कनेक्ट व्ह्यिूव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांचेकडे हॉटलाईनचे फोन उपलब्ध असतील सदर सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला जाईल व या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमितपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित करता येतील. दिलेल्या सूचनांचे (Broadcast) संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहून परीक्षा शिस्तबध्द पद्धतीने घेण्यात येईल.

परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थी/उमेदवारांनी परीक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे, असे परिषदेतर्फे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages