राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरवात

  




अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (वयोगट 14 वर्ष मुले/मुली)  क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चे आयोजन जिला क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्यातर्फे करण्यात येत आहे. या स्पर्धेला सुरवात झाली असून ही स्पर्धा 15 नोव्हेंबरपर्यंत  चालणार आहे.

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (वयोगट 14 वर्ष मुले/ मुली) क्रीडा स्पर्धा सन 2025-26 महाराष्ट्रातील आठही विभागातील 16 मुले व मुलीचे संघ असे एकूण 300 मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धाचे मुले या वयोगटातील सर्व सामने सायन्सकोर मैदान, अमरावती व मुली वयोगटातील सर्व सामने पोलीस फुटबॉल क्रीडांगण, अमरावती येथे सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये सुरु झालेले आहेत.

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायन्सकोर क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे उद्घाटन  जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष अरुण जयस्वाल, उपाध्यक्ष रविभाऊ कर्वे, अमरावती फुटबॉल संघटनेचे सचिव सुशिल सुर्वे, सेवा निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी हरिहर मिश्रा  यावेळी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच ऑलिम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व्दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू दिपाली आरोळे यांनी सर्व खेळाडूंना  क्रीडाशपथ दिली.  त्यानंतर जोएल बांगर या राष्ट्रीय खेळाडूने आणलेल्या क्रीडा ज्योतीने मशालचे प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी  श्रीमती भाकरे  यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदिप इंगोले  यांनी तर आभार सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांनी केले.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages