राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे अमरावतीत आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 10, 2025

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे अमरावतीत आयोजन

 



अमरावती, दि. ११ नोव्हेंबर (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांनी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र आणि अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती येथे राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (14 वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि. 13 ते 15 नोव्हेंबर 2025 या दरम्यान जिल्हा परिषद सायन्सकोर मैदान आणि पोलीस फुटबॉल मैदान, अमरावती येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, लातूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अमरावती आणि नागपूर या आठ विभागांतून एकूण 16 संघ सहभागी होत असून, यामध्ये सुमारे 400 पंच, अधिकारी आणि खेळाडू यांचा समावेश असेल.

 या स्पर्धेतून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी  महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे, जो मध्य प्रदेश आणि झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून, खेळाडूंची निवास व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्यातील सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages