पोस्टवूमन ते 'यूपीएससी' अधिकारी! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 10, 2025

पोस्टवूमन ते 'यूपीएससी' अधिकारी!

 


अमरावतीच्या रसिका मुळे यांनी मिळवले देशात ८७ वे स्थान!

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती प्रधान डाकघरात 'पोस्टवूमन' म्हणून कार्यरत असलेल्या  रसिका राजेश मुळे यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर देशातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा-2024 उत्तीर्ण केली आहे. राखीव यादीतून त्यांची निवड झाली असून, त्यांनी संपूर्ण देशातून 87 वी रँक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

या यशाबद्दल प्रधान डाकघर अमरावती येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवर डाकपाल सुजितकुमार लांडगे यांच्या हस्ते रसिका मुळे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. रसिका मुळे यांचे हे यश संघर्ष करणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठे प्रेरणास्थान ठरले आहे

यावेळी श्री. लांडगे यांनी रसिका मुळे यांच्या परिश्रमाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभास उपडाकपाल, सर्व सहायक डाकपाल तसेच प्रधान डाकघरातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages