स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'अवांतर वाचन' महत्त्वाचे: - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 10, 2025

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'अवांतर वाचन' महत्त्वाचे:

 


दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  केवळ अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन देखील करावे, कारण ते यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असे मत विभागीय आयुक्त कार्यालयतील अप्पर आयुक्त सूरज वाघमारे यांनी व्यक्त केले. शासकीय विभागीय ग्रंथालय, अमरावती येथे दिवाळी अंक प्रदर्शन 2025 चे नुकतेच  उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

शासकीय विभागीय ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी  आदी उपस्थित होते. शासकीय विभागीय ग्रंथालयात 1 लाख 25 हजारहून अधिक विविध विषयांवरील ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी दररोज या सेवेचा लाभ घेतात. तसेच, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अधिकाधिक नागरिकांनी  ग्रंथालय सेवेचा लाभ घेण्यासाठी या दिवाळी अंक प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. सूरज मडावी  यांनी  केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुरवाडे यांनी तर शेषराव भिरडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages