नगरपालिकांच्या निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

नगरपालिकांच्या निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

 



अमरावती, दि. २७(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
) : येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूरबाजार येथे भेट दिली. दरम्यान त्यांनी नगरपालिकेच्या शाळांना भेट दिली.

नगर परिषद चांदूर बाजार सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सोनल सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गीता ठाकरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार मनोज सोनारकर, श्री. गवई, यश अग्रवाल, श्री. थोरात आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी चांदूरबाजार येथील स्ट्राँग रूमची पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना साहित्य वाटप होणाऱ्या ठिकाणची पाहणी केली. दरम्यान श्री. येरेकर यांनी नगर परिषद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाला भेट दिली. विद्यालयातील खोली क्र. 1 मधील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी सहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याच शाळेत सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages