अखेर संत्रा उत्पादकांना दिलासा! १७.२६ कोटींचा पीक विमा मंजूर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

अखेर संत्रा उत्पादकांना दिलासा! १७.२६ कोटींचा पीक विमा मंजूर



दि.२७ शिरजगाव कसबा: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अमरावती जिल्ह्यातील संतरा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. विमा कंपनीने टाळाटाळ केल्यानंतर,ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क  ने  उचलून धरलेल्या मुद्द्यामुळे आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे अखेर ३,८१५ शेतकऱ्यांना १७ कोटी २६ लाख ८८ हजार ११० रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे.
  हवामान आधारित फळपिक विमा २०२४-२५ वर्षांमध्ये नोव्हेंबर महिन्यात सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनीद्वारे शेतकऱ्यांनी विमा काढला होता. सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनी सुरुवातीला नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होती. कंपनीने 'ट्रिगर' लागू न झाल्याचे कारण देत दावा फेटाळला होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. शासन स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये सातत्याने दबाव आणला गेला. या दबावामुळे आणि बातमीदारीच्या प्रभावामुळे विमा कंपनीला झुकावे लागले आणि अखेर 'ट्रिगर' मान्य करावा लागला.
 जिल्ह्यातील ३,८१५ संतरा उत्पादक शेतकऱ्यांनी ३,८४४ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ३.३० कोटी रुपयांचा विमा प्रीमियम भरला होता.
"पात्र शेतकऱ्यांना मदत"
"येत्या काही दिवसांत रक्कम जमा होईल"
राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधीक्षक, अमरावती: "शासनाच्या निरंतर पाठपुराव्यामुळे विमा कंपनीने ट्रिगर स्वीकारला आहे. काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल."
"दहा दिवसांत परतावा रक्कम जमा करण्यात येईल"
रोशन देशमुख, जिल्हा प्रतिनिधी, सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनी, अमरावती: "कंपनीने ट्रिगर मान्य केला असून, जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील १० दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल."
या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages