इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत सूचना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, November 9, 2025

इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत सूचना



सविस्तर माहितीसाठी मंडळाचे www.mahahsscboard.in संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. १० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी.) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांनी त्यांची आवेदनपत्रे संबंधित कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत सादर करावीत, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरण्याबाबतच्या विलंब शुल्काच्या  तारखांना अंतीम मुदतवाढ देण्यात आली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. ४ ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आवेदनपत्रे भरावयाची असून विलंब शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे मंडळाकडे भरणा करावयाचा कालावधी दि. ४ ते ११ नोव्हेंबर आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT ची पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट १२ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा कराव्यात. परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन भरण्यासंदर्भात तसेच अनुषंगीक सूचना, माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाचे अवलोकन करावे, असे आवाहनही मंडळाव्दारे करण्यात आले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages