अमरावती जिल्ह्यातील कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 18, 2025

अमरावती जिल्ह्यातील कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार!

      
                                                     



▶ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

अमरावती प्रतिनिधी- दिनांक १९ सचिन ढोके 

धारणी : 

     मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सोमवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते.

रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. देशातील महामार्गाचे काम एशियन बँक करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम कशा पद्धतीने करण्यात येईल, मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे याची माहिती घेण्यात येईल.

मेळघाटातील युवकांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार शिक्षणाची सोय होईल, तसेच मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलनासाठी धारणी आणि अन्य एका ठिकाणी केंद्र उभारण्यात येईल. यातून दररोज नगदी पैसे मिळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी गडकरी यांच्याहस्ते कारागीरहाटचे विमोचन करण्यात आले. डॉ. निरूपमा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. योगेश बापट यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages