श्री दादाजींच्या चरणी भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह; शिराळ्यात भक्तीमय वातावरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 24, 2025

श्री दादाजींच्या चरणी भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह; शिराळ्यात भक्तीमय वातावरण

     🥀🥀 जो दादा के धाम दादा उनके काम 🥀🥀

दि. २४  शिराळा (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शिराळा येथील श्री दादाजी धुनिवाले संस्थान  येथे नियमितपणे विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात.

 श्री दादाजी धुनीवाले यांची पुण्यतिथी (बरसी पर्व) दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साजरी केली जाते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरांजली अर्पण करतात.

शिराळा येथील श्री दादाजी धुनीवाले संस्थान शिराळा तर्फे बुधवार दि. २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत भागवतकथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. महारुद्राभिषेक, अभिषेक नर्मदामातेचा तिर्थस्थापना, भागवत कथा तिर्थ स्थापना तर कथा प्रारंभ २६ नोव्हेंबर सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ वाजे पर्यंत राहील तर कथा समाप्ती २ डिसेंबर साय ६ वाजता राहिल, गोपालकाला कथाव्यास प्रेममुर्ती श्री हभप शिवदास महाराज श्रुंगारे यवतमाळ तसेच पुण्यतिथी समारोह समाप्ती बुधवार दि ३ डिसेंबर होमहवन व  गावातील प्रमुख मार्गावरून दिंड्यासह भव्य शोभायात्रा गोपालकाला व  महाप्रसाद वितरण करण्यात येईल, दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री दादाजी धुनीवाले संस्थान शिराळा ता.जि. अमरावती येथे श्री दादाजी धुनीवाले यांचा पुण्यतिथी सोहळा बुधवार दि २६ नोव्हेंबर ते ३ दिसंबर पर्यंत सपन्न होत आहे. पुण्यतिथी सोहळ्यात दररोज सकाळी ९ ते १२ व ३ ते ६ या वेळात कथाव्यास :-  प्रेममुर्ती श्री हभप शिवदास महाराज श्रुंगारे यवतमाळ यांच्या अमृतमय वाणीतुन संगितमय भागवत कथेचे आयोजन केले आहे. तसेच दररोज सायंकाळी हरिपाठ भजने व किर्तनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहे. समारोपीय कार्यक्रम बुधवार दि ३ डिसेंबर ला सकाळी ५.३०  वा. श्री ची प्रातकालीन दैनिक आरती सकाळी ७ वाजता होमहवन, तर १० ते १ गोपाल काल्याचे किर्तन हभप शिवदास  महाराज श्रृंगारे यवतमाळ यांच्या अमृतमय वाणीतून करतील. दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत श्री ची पालखी व शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून दिंड्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. साय.६.३०  वाजता दहीहंडी  व कालाप्रसाद राहील. 

प्रमुख उपस्थिती श्री दादाजी धुनिवाले संस्थान शिराळा अध्यक्ष मनोजभाऊ देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपाध्यक्ष अॅड गजाननराव के. पुंडकर अमरावती खा. बळवंतभाऊ वानखडे, श्रीमती प्रितीताई संजयराव बंड, कृउबास संचालक सौ. अलकाताई शिवाजीराव देशमुख, खरेदी विक्री संस्था अमरावती अध्यक्ष अभय महल्ले, शिराळा सरपंचा कु अंकिता मिलिंद  तायडे उपसरपंच अनिकेत खाडे, जयेशभाऊ बोडखे अम. नितीनभाऊ कोल्हटकर अम. शरदभाऊ देशमुख अम. नानाभाऊ देशमुख अम. डॉ रविंद्र उ. वाघमारे वडुरा विदर्भ यु वेल्फेअर सो. अम. सचिव युवराजभाऊ चौधरी, राजेंद्र अग्रवाल, नरेंद्रजी अग्रवाल, शैलेश अग्रवाल, सिध्दार्थ दुबेजी , सुजित हरिदास गुरुजी परतवाडा बबनराव ज. देशमुख सुरळी ओमप्रकाश र टंडन चांदुरबाजार, हरिहर महाराज निभोरा, निरंजनदास महाराज खडका जामगाव आदी उपस्थित राहतील तरी भाविक भक्तानी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages