पुणे जमीन घोटाळा: पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीने मुद्रांक शुल्पासाठी पुन्हा मागितली मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

पुणे जमीन घोटाळा: पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीने मुद्रांक शुल्पासाठी पुन्हा मागितली मुदतवाढ

 

दि.२६ पुणे/मुंबई:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीविरोधात पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत. कंपनीने ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे पुन्हा एकदा मुदतवाढ मागितल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
कंपनीला यापूर्वी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर कंपनीच्या वकिलांनी उत्तर सादर करण्यासाठी आणि शुल्क भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत मागितली आहे.
  पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली शासकीय व महार वतનની जमीन 'अमेडिया' कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. या व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचाही आक्षेप नोंदवण्यात आला होता.
  या प्रकरणाची चौकशी महसूल विभागाने विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमार्फत सुरू आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असतानाच कंपनीने मुदतवाढ मागितली आहे.
या मुदतवाढीच्या मागणीमुळे या संपूर्ण व्यवहारावर आणि शासकीय जमिनीच्या हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महसूल विभाग आणि नोंदणी विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages