सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात १२ कोटींचे कृषिकर्ज वितरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात १२ कोटींचे कृषिकर्ज वितरण


अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे काल  पथरोट येथे कृषि कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 12 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

पथरोटचे उपसरपंच अतुल वाठ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, तर सेंट्रल बँकेच्या सेंट्रल ऑफिसचे महाप्रबंधक डॉ. भास्कर, तसेच अमरावती क्षेत्रिय प्रमुख सुनील पाण्डेय, अचलपूरचे गटविकास अधिकारी सुधीर अरबाट उपस्थित होते.

डॉ. भास्कर यांच्या उपस्थितीत ग्राहकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कृषि कर्ज वितरीत करण्यात आले. त्यांनी उपस्थित ग्राहक, नागरिकांना सेंट्रल बँकेच्या विविध कर्ज योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यात सेंट्रल बँक क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक दीपक दाबोले, राजकुमार तरते यांनी कृषि कर्जाच्या विविध योजना, तसेच कोल्ड स्टोरेज, पोल्ट्री फार्म योजना, फूड प्रोसेसिंग, किसान व्हीकल, पीएम कुसुम योजना, कृषि इंफ्रास्ट्रक्चर फंड, बचतगट कर्ज योजनांची माहिती दिली.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश मुंडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages