Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

👑 लीला आदिवासी कन्येची उत्तुंग भरारी! समाज कल्याण विभागात 'सह आयुक्त' पदी नियुक्ती 🏆


              लीला चे व तिच्या आईची अभिनंदन करतांना कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय मुळे व उमेश भेले

दि. ७ शिरजगाव कसबा(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 

जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर शिक्षण घेतलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथील आदिवासी समाजातील कुमारी लीला मतिया बाजीराव इवने या आदिवासी कन्येची  नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या  अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या अशा 'सह आयुक्त' (Joint Commissioner) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लीला या कन्येने प्रशासकीय सेवेत मोठे यश संपादन केले आहे.हे यश केवळ लीला यांचे नसून, राज्यातील आदिवासी आणि वंचित समाजातील तरुणाईला 'स्वप्न सत्यात उतरवता येतात' हे सिद्ध करणारे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

🌟 खडतर संघर्षातून प्रशासकीय सेवेपर्यंत:

 लीला आदिवासी कुटंबातील, आई शेतमजूर घरी अठरा विश्व दारिद्र्य असून मूलभूत सुविधांची कमतरता आणि आर्थिक अडचणी असतानाही, शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या संघर्षातून उच्च शिक्षण पूर्ण केले.माधान येथील कस्तुरबा कन्या आश्रम शाळा मुलींचे वसतिगृह येथे प्रवेश घेत शिक्षणाकरिता थोर समाज सेविका पूज्य ताराबेन मशरुवाला यांच्या कस्तुरबा आश्रम माधान येथील वसतिगृहात ती दाखल झाली

💡 आदिवासी तरुणाईसाठी 'आशेचा किरण'

सामाजिक आणि भौगोलिक अडचणींवर मात करून मिळवलेले लीला यांचे हे यश, राज्यातील आदिवासी तरुणाईसाठी एक मोठा प्रेरणास्रोत ठरला आहे.लीला इवने शिक्षणाचा खडतर प्रवास जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायी उदाहरण आहे

इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तिच्या या यशाबद्दल कस्तुरबा आश्रम माधान येथील संस्थेचे पदाधिकारी व कस्तुरबा माध्यमिक शाळेचे शिक्षक आदींनी तिचे अभिनंदन करीत शिक्षकांनी तिचा घरी जाऊन सत्कार केला आहे.एका निरक्षर व मजुरी करणाऱ्या मातेची कन्या या उच्च पदावर पोहोचल्याबद्दल सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे.

लीला यांच्या या उत्तुंग भरारीबद्दल समाज कल्याण विभाग, विविध सामाजिक संस्था आणि सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









Post a Comment

0 Comments