'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर व्याख्यान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 10, 2025

'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर व्याख्यान

 

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नुकतेच अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल गवई, हे प्रमुख व्याख्याते होते. डॉ. गवई यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बोधपर उदाहरणे व गोष्टींच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्याचे महत्त्व पटवून देत, अंमली पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि सकारात्मक जीवनशैली अंगिकारण्यास प्रोत्साहन मिळाले.समाज कल्याण अधिकारी,  संत गाडगेबाबा विद्यापीठाचे  गृहपाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages