राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 9, 2025

राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

केंद्र सरकार शालेय पुरस्कार योजना 

अमरावती, दि. 0९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): केंद्र सरकार पुरस्कृत नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप या परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता सन 2025-26 या वर्षासाठी अर्ज करण्याची दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून, पात्र विद्यार्थी,लाभार्थी यांनी 24 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र व्ही. जाधवर यांनी केले आहे.

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप ही शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या, अर्धभटक्या जमाती आणि भूमिहीन शेतमजूर, पारंपरिक कारागीर यांसारख्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना परदेशात मास्टर्स (पदव्युत्तर) किंवा पीएच.डी. चे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करते. केंद्र शासनाच्या www.nosmsje.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 ऑक्टोबर 2025 आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages